"साप"शेतकऱ्यांचा मित्र,नागपंचमी आणि निसर्गाचा। समतोल.
"साप" नुसतं नाव जरी घेतलं तर अंगावर काटा उभा राहतो त्यातही "नाग" म्हटलं की भीतीने गाळण उडते.आज नागपंचमी आहे त्यामुळे सगळीकडे नागांच्या मनोभावे पुजेबद्दल बोललं जातंय.नागदेवता,भगवान शंकरराचा अवतार,नागांचे धर्मातील महत्त्व, त्याचे अवतार असे अनेक किस्से सांगितले जात आहेत.आजचा दिवस सोडून इतर दिवशी नाग साप सोडाच इतर कोणताही बिनविषारी साप जरी दिसला तर जे हात आज नागाच्या प्रतिमेसमोर जोडले जातात तेच हात त्यांना मारण्यासाठी काठ्या घेऊन पुढे येतात.वास्तविक नागाला आपल्या संस्कृतीत इतकं मनाचं स्थान मिळणे हे त्याची आपल्या कृषीसंस्कृती साठी असलेली उपयुक्तता सिद्ध करते तरीही आजचा दिवस सोडून कित्येक साप दररोज त्यांच्याविषयी असलेल्या गैरसमज आणि अफवांमुळे मारले जातात.सापांमुळे निसर्गातील अन्नसाखळी चा समतोल साधला जातो याचे पुरावे आपणास वेळोवेळी मिळतात.तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करून विनाकारण भीती मनात बाळगतो.साप"शेतकऱ्याचा मित्र"आहे हे खऱ्याअर्थाने आपण समजून घेतले पाहिजे अनेक निसर्गमित्र,सर्पमित्रांनी स्वतःला सापांच्या बचावासाठी वाहून घेतले आहे.फक्त एक दिवस नाग सापांविषयी कृत...