कुस्तीला खेळालाही ही मिळावी इतर खेळांसारखी प्रसिद्धी..

                   कोणत्याही खेळाचं महत्त्व वाढत ते त्याला मिळालेल्या किंवा मिळत असणाऱ्या प्रसिद्धी मुळे.खेळाला जेवढी प्रसिद्धी मिळेल तेवढे जास्त खेळाडू त्या खेळाकडे आकर्षित होत असतात आणि जेवढे जास्त खेळाडू आकर्षित होतील तेवढे दर्जेदार खेळाडू त्या खेळातून तयार होतात..                               
                कुस्ती हा खेळ भारतात अतिशय लोकप्रिय आहे.विशेषतः ग्रामीण भागात  तांबड्या मातीत हा खेळ खेळला जातो अगदी प्राचीन काळापासून भारतात कुस्ती खेळाला विशेष महत्त्व आहे. प्राचीन काळापासून ते आजपर्यंत या खेळाला टिकवून ठेवण्यात आणि त्याचा विकास करण्यात अनेक महान लोकांनी यशस्वी प्रयत्न केले.राजेशाही च्या काळात इतर अनेक कलांना राजाश्रय होता तसा कुस्तीला ही होता.ज्या ठिकाणी कुस्तीला राजाश्रय होता त्या ठिकाणी कुस्ती प्रसिध्दीच्या सर्वोच्च शिखरावर होती हे दिसून येतंय.याचे उत्तम उदाहरण म्हणजे कोल्हापूर संस्थान.कुस्तीप्रेमी असणाऱ्या राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी कुस्तीला राजाश्रय दिल्याने कुस्तीला सोन्याचे दिवस आले होते.आजही भारतात कुस्ती हा खेळ चांगलाच लोकप्रिय आहे मातीबरोबर मॅट वरील कुस्तीलाही चांगले दिवस येत आहेत.लोकाश्रयाच्या जोरावर कुस्तीतून अनेक चांगले खेळाडू घडताना दिसत आहेत.
                पण तरीही भारतात काही विशिष्ट खेळांनाच जास्त प्रसिद्धी मिळत असते.कुस्ती हा अस्सल मातीतला रांगडा खेळ असूनही प्रसिद्धी माध्यमाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते.इतर खेळांच्या तुलनेत कुस्तीला अजून प्रसिद्धी मिळाली तर अनेक खेळाडू या खेळाकडे आकर्षित होतील आणि आपल्या मातीतून अजून चांगले खेळाडू तयार व्हायला हातभार लागेल.
           
            खालील फोटोतील स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी पुस्तकाचं हे मुखपृष्ठ,यावर गेल्या वर्षीच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांचा अविस्मरणीय क्षण छापून आलाय.पै हर्षवर्धन सदगीर आणि पै शैलेश शेळके यांचा कुस्तीतील दोस्ती दाखवणारा हा क्षण प्रत्येक कुस्ती प्रेमीच्या आणि क्रीडाप्रेमींच्या काळजावर कोरला गेला.या पुस्तकाच्या लेखकांचे आभार व्यक्त करावे वाटतात.तुम्ही कुस्ती या अस्सल मातीतल्या आपल्या खेळाला पुस्तकाच्या मुखपृष्ठावर प्रसिद्धी दिलीत याबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद.फक्त क्रिकेट तेवढाच आपला खेळ अस समजलं जाणाऱ्या भारतात पुस्तके मासिके वृत्तपत्रे यांच्या मुखपृष्ठावर अस्सल मातीतल्या खेळांना तस कमीच स्थान मिळत.सगळीकडे फक्त क्रिकेटलाच अवास्तव प्रसिद्धी मिळते. क्रिकेटसारखा खेळ खेळायला नको किंवा त्याला प्रसिद्धी नको अस नाही पण आपली क्रीडा संस्कृती जपणारे शरीर समृद्ध करणारे मातीतील खेळ विसरून चालणार नाही.आज कोरोनाच्या विळख्यात सगळे खेळ भरडून निघाले आहेत.पण तरीही पैसा मिळवून देणारे म्हणून क्रिकेट आयपीएल सुरू होतंय,पण शरीर निरोगी आणि समृध्द करणाऱ्या तालमी आणि कुस्ती स्पर्धा सुरू होत नाहीत.मैदाने बंद असल्यामुळे आज हजारो कुस्तीगीरांचे भविष्य अंधःकार मय झालेले आहे..शरीर निरोगी ठेवण्यासाठी व्यायामाची आवश्यकता कित्येक वेळा अधोरेखित झाली आहे.या कोरोनाच्या काळातही व्यायामाचे महत्व आपल्या लक्षात आलेलं आहे.

                या पुस्तकाच्या मुखपृष्ठाप्रमाणे जर आपल्या मातीतल्या खेळांना प्रसिद्धी मिळाली तर व्यायाम आणि अस्सल मातीतील खेळ याचं महत्व लक्षात येऊन निरोगी आणि बलशाली पिढी घडण्यास नक्कीच हातभार लागेल...

धन्यवाद....
 लेखन-पै.श्रीकांत मेडशिंगे......✍      पै.हर्षवर्धन सदगीर आणि पै शैलेश शेळके.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

"साप"शेतकऱ्यांचा मित्र,नागपंचमी आणि निसर्गाचा। समतोल.

मोठ्या प्रमाणात जागा निघालेली एक परीक्षा.....आणि सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा...✍️