पोस्ट्स

ऑगस्ट, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

"साप"शेतकऱ्यांचा मित्र,नागपंचमी आणि निसर्गाचा। समतोल.

इमेज
"साप" नुसतं नाव जरी घेतलं तर अंगावर काटा उभा राहतो त्यातही "नाग" म्हटलं की भीतीने गाळण उडते.आज नागपंचमी आहे त्यामुळे सगळीकडे नागांच्या मनोभावे पुजेबद्दल बोललं जातंय.नागदेवता,भगवान शंकरराचा अवतार,नागांचे धर्मातील महत्त्व, त्याचे अवतार असे अनेक किस्से सांगितले जात आहेत.आजचा दिवस सोडून इतर दिवशी नाग साप सोडाच इतर कोणताही बिनविषारी साप जरी दिसला तर जे हात आज नागाच्या प्रतिमेसमोर जोडले जातात तेच हात त्यांना मारण्यासाठी काठ्या घेऊन पुढे येतात.वास्तविक नागाला आपल्या संस्कृतीत इतकं मनाचं स्थान मिळणे हे त्याची आपल्या कृषीसंस्कृती साठी असलेली उपयुक्तता सिद्ध करते तरीही आजचा दिवस सोडून कित्येक साप दररोज त्यांच्याविषयी असलेल्या गैरसमज आणि अफवांमुळे मारले जातात.सापांमुळे निसर्गातील अन्नसाखळी चा समतोल साधला जातो याचे पुरावे आपणास वेळोवेळी मिळतात.तरीही आपण त्याकडे दुर्लक्ष करून विनाकारण भीती मनात बाळगतो.साप"शेतकऱ्याचा मित्र"आहे हे खऱ्याअर्थाने आपण समजून घेतले पाहिजे अनेक निसर्गमित्र,सर्पमित्रांनी स्वतःला सापांच्या बचावासाठी वाहून घेतले आहे.फक्त एक दिवस नाग सापांविषयी कृत...

मोठ्या प्रमाणात जागा निघालेली एक परीक्षा.....आणि सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा...✍️

इमेज
खूप दिवसापासून खोळंबलेली तलाठी परीक्षेची जाहिरात येताच स्पर्धा परिक्षा देणाऱ्या,आणि सरकारी नोकरीसाठी धडपडणाऱ्या युवक युवतींमधे एकच गडबड सूरू झाली आहे जो तो तलाठी जाहिरातीबद्दल बोलू लागलाय  संपूर्ण महाराष्ट्रभर 4000 पेक्षा जास्त जागा असल्याने सगळ्यांनाच त्याची उत्सुकता लागली आहे.या जिल्ह्यात येवढ्या जागा त्या जिल्ह्यात तेवढ्या जागा कुठे किती अर्ज येणार असे अंदाज आणि बरच काही. कुठल्या जिल्ह्यातून फॉर्म भरायचा याची चाचपणी अनेकजण करू लागलेत नियमित अभ्यास करणाऱ्यांनी अभ्यासाला जोर लावलाय.त्यांनी सगळा फोकस तलाठी परीक्षेवर लावुन जोरदार तयारी सुरू केली आहे. @अभ्यास...✍️ अभ्यास सोडुन लग्न करून स्थिरस्थावर झालेल्या मित्रांचे फोन अभ्यासात असलेल्या मित्रांना यायला लागले आहेत त्यात ते अभ्यासाविषयी आणि पुस्तकांविषयी चौकशी करू लागले आहेत.अनेकवेळा अपयश आल्याने स्पर्धा परिक्षेला रामराम करून कामाला लागलेल्या अनेकांनी जुन्या पुस्तकांवरची धूळ झटकून पुन्हा नव्याने त्यातली पुस्तके उघडायला सुरुवात केली आहे.हवसे,गवसे,नवसे सगळेच आता जोमात तयारी करण्यासाठी मैदानात उतरले आहेत. पुस्तके खरेदी करण्यासाठी स्पर्...